मुंबई (पी.डी.पाटील): “भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई®” या संस्थेच्या स्वादिष्ट व्यंजन समूहाच्या वतीने नुकतीच (ऑगस्ट 2025) “पावसाळी रानभाज्या राज्यस्तरीय अन्नपूर्णा पाककृती स्पर्धा” ऑनलाईन स्वरूपात आयोजित केली होती.
या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून अनेकांनी सहभाग घेतला होता. दुर्मिळ होतं चाललेल्या आरोग्यदायी रानभाज्यांची अनेकांना ओळख व्हावी हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.या स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून सौ. कल्पना किरण विसपुते ( कांदिवली ), व सौ. भावना भास्कर खंदारे (मुंबई) यांना मिळाला. द्वितीय क्रमांक विभागून सौ.अर्चना नितीनकुमार कुलथे (मुंबई), सौ शोभना कानस्कर व सौ. सुषमा पोतदार (नवीन पनवेल ) यांना तर तृतीय क्रमांक विभागून सौ. सुजाता सुदेश घायतडके व वैशाली कदम (नवी मुंबई ) यांना मिळाला. तसेच उत्तेजनार्थ सौ. सायली राणे (रत्नागिरी ),सौ.रजनी सावंत (वैभववाडी ) यांना देण्यात आला.
सर्व विजेत्या स्पर्धकांना संस्थे तर्फे लवकरच प्रमाणपत्र दिली जातील. विशेष इच्छुक विजेत्यांना दादर (मुंबई) येथे होणाऱ्या संस्था उपक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र दिली जातील. भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई®चे विविध कार्यकारणी सदस्य व स्वादिष्ट समूहाचे आयोजक व परीक्षक यांचे यामध्ये बहुमोल सहकार्य लाभले.
“पावसाळी रानभाज्या राज्यस्तरीय अन्नपूर्णा पाककृती स्पर्धा” ऑनलाईन स्वरूपात संपन्न
RELATED ARTICLES