Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रगुजरात येथील राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत रयत जिमखानाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एकूण...

गुजरात येथील राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत रयत जिमखानाच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एकूण 16 पदके पटकावली

उंडाळे प्रतिनिधी : उंडाळे येथील रयत जिमखानाच्या खेळाडूंनी विविध प्रकारात 8 सुवर्ण ,7 रजत व 1 कास्य पदकासह 16 पदके पटकावली. येथील रयत जिमखानाच्या खेळाडूंनी मेहसाणा गुजरात येथे पावर लिफ्टिंग स्पोर्ट ऑर्गनायझेशन यांच्या मान्यतेने तसेच देवाज फिटनेसचे देवांग पुजारा यांच्या पुढाकाराने 31 जुलै ते 3 ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत 83 किलो वजनी गटात प्रमोद पाटील यांनी राष्ट्रीयस्तरा वर सलग पाचव्या वेळेस दोन सुवर्ण पदके पटकावली ,तर अभिराज काळे याने 105 kg गटात 1 सुवर्ण व एक रजत, प्रथमेश माने याने फुल पावर लिफ्टिंग व डेड लिफ्ट प्रकारात अनुक्रमे 105kg गटात दोन रजत, रुचिरा पाटील हिने 83kg गटात दोन सुवर्ण, तन्मय माळी ह्याने 83kg गटात एक कास्य पदक ,साहील थोरात ह्याने 93kg गटात एक सुवर्ण व एक रजत तसेच स्मिता पाटील ह्यांनी 57 kg गटात अनुक्रमे बेंच व डेडलिफ्ट प्रकारात 2 रजत पदके पटकावली, शर्वरी पाटील व साईराज पाटील यांनी लहान गटात डेडलिफ्ट प्रकारात उत्कृष्ठ प्रात्यक्षिक सादर करुण उपस्थितांची मने जिंकली अभिराज काळे हा दादा उंडाळकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे तर रुचिरा पाटील ही सद्गुरु गाडगे महाराज विद्यालयाची विद्यार्थीनी आहे सदर स्पर्धेत भारतातील 22 राज्यातून 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला महाराष्ट्राच्या अक्षय कारंडे ने 93 किलो वजनी गटात 300 किलो वजन उचलून राष्ट्रीय रेकॉर्ड केले सदर स्पर्धेचे उद्घाटन व पदक वितरण समारंभ मेहसाणाचे महानगरपालिकेचे कमिशनर रवींद्र खटाला, पी एस ओ चे जनरल सेक्रेटरी दुर्गेश राजुरिया, महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सेक्रेटरी सैदल सोंडे ,समीर जोगळेकर व दिव्यांश पुजारा जेष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू दादा हलदार व प्रफुल्ल जाधव यांच्या हस्ते पार पडला सदर यशा बद्दल माजी राज्यपाल माजी खा. श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले ,ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील व रयत साखरचे अध्यक्ष उदयसिंह पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संग्राम पाटील व स्मारक समितीचे सदस्य विजयसिंह पाटील यांनी सर्व खेळाडूंच अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील खेळाडूंनी शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय पावर लिफ्टिंग साठी लागणारे साहित्य उपलब्ध नसताना देखील 16 पदके मिळवून यश संपादन केले हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, मी सलग पाच वर्षे राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदके पटकाविले आहेत तर एशियन पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके पटकावले आहेत. आता तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे .प्रमोद पाटील उंडाळे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments