प्रतिनिधी : मसूर (ता. कराड) येथील मसूर नगरीचे भाग्यविधाते स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, महानंदा दूध संघ मुंबईचे संचालक व कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मा. श्री वसंतराव शंकरराव जगदाळे (आबा) यांचे सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आज रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनास सुरुवात होईल. सकाळी ठिक 10:00 वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल व मसूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आबांच्या निधनाने जगदाळे कुटुंब व त्यांच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, अशी भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वरचरणी अर्पण करण्यात आली.