तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार 2025 जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. यावेळी ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा.ए.बी.कणसे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 100 पुस्तकामधून 23 लेखक व पुस्तके यांची निवड केली आहे.
पुरस्कारप्राप्त लेखक आणि पुस्तकांची नावे (कंसात) पुढीलप्रमाणे : डाॅ.प्रभाकर शेळके (डबल ढोलकी), प्रा.विश्वजित जाधव (आठवणींच्या सावल्या), दिव्या बाबर (शब्दांच्या वाटेवर), प्रा.रत्नमाला शिंदे-स्वामी (गुंफण), दिनेश फडतरे (रॅंडम), रेखा दीक्षित (मौनातला चाफा), सौ.सविता माने (वृंदावनातील महानंदा), चंद्रकांत पोतदार (प्रहाराच्या एैरणीवर), शरद अत्रे (रंग निसर्गाचे), दत्तात्रय शिवराम हिर्लेकर-गुरुजी (कर्तव्यपूर्ती), प्रा.अलका सपकाळ (फुलांची शाळा), सौ.आरती लाटणे (टेक ऑफ काशी यात्रा), सौ.शीला माने (देश-विदेशी खेळांची रुपरेषा), विनायक कुलकर्णी (आभार वेदनांचे), सत्यवान मंडलिक (स्वातंत्र्याची 75 वर्षे), सौ.अलका कोठावदे (सैतानी त्रिकोण), सौ.अनिता गोरे (क्रांतीयोध्दा), सोमनाथ आवडाजी पगार (कारुण्यबोध), डाॅ.सुनिता चव्हाण (इच्छामरण), पंढरी बनसोडे (आक्रोश), प्रा.इंद्रजीत पाटील (चिबाड), सचिन पाटील (फक्कड), विक्रांत केसरकर (संगतिचो शिमगो),
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासोबतच वाचन चळवळ समृध्द करण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धा, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचं झाड, स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, पुस्तक भेट अभियान, निबंध स्पर्धा, ग्रंथालयांना पुस्तके भेट, शासनाच्या वाचन चळवळ उपक्रमात सहभाग, पुस्तकांची आरास, पुस्तकांची गुढी, स्पंदन एक्सप्रेस मधून लिखाणाला प्रोत्साहन याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
सन्मानपत्र आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारप्राप्त लेखक, कवी यांना लवकरच एका समारंभात गौरवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संदीप डाकवे यांनी दिली आहे.
राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार 2025 जाहीर
RELATED ARTICLES