प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील मौजे घोगाव येथे श्री बाळसिद्धनाथाची श्रावणी यात्रा मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या यात्रेला आटके, दुशेरे तसेच घोगाव गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या यात्रेची खासियत म्हणजे प्रथमच आटके ते घोगाव अशी महिलांची दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीचे स्वागत घोगाव ग्रामस्थांनी उत्साहात केले. यंदाचे हे यात्रेचे 18 वे वर्ष असून यात्रेच्या निमित्ताने विविध स्टॉल, खेळणी दुकाने आणि अन्य उपक्रमांनी परिसर गजबजून गेला होता.सालाबादप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
श्रावणी यात्रेचा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा भक्तांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला.