मुंबई(रमेश औताडे) : डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध यावर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी एक माहितीपूर्ण जनजागृती सुरक्षा बंधन मोहीम आयोजित करण्यात आली. सुरक्षा बंधन मोहिमेचा भाग म्हणून डाबर ओडोमॉसने मुलांना राख्या आणि ओडोमॉसचे मच्छर रिपेलंट उत्पादने वाटप करत डासांपासून होणाऱ्या गंभीर आजारांपासून संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आजारांचा धोका समजावून सांगणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचा प्रचार करण्यासाठी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली मोहीम भाऊ–बहिणींच्या संरक्षण नात्याचे बंधन म्हणून राबवण्यात येत आहे. असे डाबर इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग हेड – होम केअर वैभव राठी यांनी सांगितले.सुरक्षा बंधन ही मोहीम डाबर ओडोमॉसच्या समुदायाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी असलेल्या कटिबद्धतेचे एक प्रतीक आहे. समाजसेविका बेबीताई लांडगे, डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार , प्राचार्य फरिदा शेख, अक्षदा कळंबे व विजेता प्राथमिक विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.