प्रतिनिधी : मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा कबुतरखाना बंद केला होता. यावर आक्षेप घेत जैन समाजाने तीव्र आंदोलन छेडले होते आणि ४ ऑगस्ट रोजी मोर्चाही काढला होता. कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसन आजार होतात, हे कारण फोल असून चौक हडपण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. न्यायालयाने मात्र नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत, आदेशाचा कोणीही अवमान करू नये, असा इशारा दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात हरकत असल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील लढाई सुप्रीम कोर्टात सुरू होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दादर कबुतरखाना बंदी कायम; न्यायालयाचे आरोग्याला प्राधान्य
RELATED ARTICLES