प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या संजय मधुकर मुळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे, मानवतावादी चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर इतर पुरस्कार प्राप्त मान्यवर यावेळी उपस्थित होते. करवीरनगरी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी संजय मुळे यांना लोकमाता अहिल्यामाई होळकर राष्ट्रीयंसन्मान पुरस्कार, लोकराजा राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार, द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्ड आणि फाव ॲंड फेअर्स यांच्याकडून देण्यात येणाऱ्या “बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर”, महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार, एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे ही ते मानकरी राहिले आहेत.
….