Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रठाकरे गटाला नवी मुंबईत धक्का: उपनेते विठ्ठल मोरे यांचा राजीनामा

ठाकरे गटाला नवी मुंबईत धक्का: उपनेते विठ्ठल मोरे यांचा राजीनामा

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर एकामागोमाग एक धक्के बसत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) ला नवी मुंबईतून आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे कालच मातोश्रीवर झालेल्या बैठकीला मोरे उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा सादर केला.

राजीनाम्यात त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. “आज ‘सामना’मधून पक्षातील पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. मात्र त्यापूर्वी मला कोणतीही कल्पना देण्यात आली नाही,” असं त्यांनी म्हटलं.

मोरे यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. गेल्या १० वर्षांपासून बेलापूर विधानसभा मतदारसंघात ते सक्रिय होते. संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, आणि उपनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं.

राजीनाम्याच्या मागे आणखी एक मोठं कारण त्यांनी नमूद केलं आहे — “एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून माझ्या हॉटेलवर तीन वेळा मध्यरात्री छापे टाकण्यात आले. कोणतेही अनधिकृत बांधकाम नसताना मनपा व पोलिसांनी तोडक कारवाई केली. तरीही मी पक्षाशी निष्ठावान राहिलो. पण राजन विचारे यांनी शिंदे गटासाठी जे सहज केलं, त्याने मनाला मोठा धक्का बसला.”

“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची व उद्धव साहेबांची क्षमा मागून आणि आपल्या माझ्यावरील विश्वासाबद्दल मनापासून आभार मानून मी उपनेतेपदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

हा राजीनामा ठाकरे गटासाठी मोठी राजकीय आणि संघटनात्मक घसरण ठरू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments