सातारा(अजित जगताप) : हूमगाव तालुका जावली येथील कुमारी प्राजक्ता विलास पवार हिने वयाच्या २३ व्या वर्षी चार्टट अकाउंटंट परीक्षेत यश मिळवले.
प्राजक्ताने मुंबई येथे बी.कॉम पदवी पर्यंत शिक्षण घेतले असून तिने पुढे सीए होण्याच्या होण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यासास सुरुवात केली.
तिने वयाच्या २३ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत दैदिप्यमान असे यश मिळवले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे ,आ.रोहितदादा पवार यांच्या हस्ते प्राजक्ताच्या यशाबद्दल तिचा व तिचे आई-वडील असा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.प्राजक्ता ही हुमगाव येथील हार्डवेअर व्यावसायिक सुनील पवार यांची पुतणी असून,तिच्या या यशाबद्दल तिचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,माजी सभापती मोहनराव शिंदे,बुवासाहेब पिसाळ,दत्ताशेठ भालेघरे,सामाजिक कार्यकर्ते शरद रांजणे,ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.
“मला हे यश मार्गदर्शक शिक्षक,आई वडील यांच्या प्रेरणेतून मिळवता आले.जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन याचा संगम म्हणजे माझे हे यश आहे.”
कु. प्राजक्ता पवार
प्राजक्ता पवार हिचा सहकुटुंब सत्कार करताना प्रदेशअध्यक्ष शशिकांत शिंदे,आ.रोहितदादा पवार,बुवासाहेब पिसाळ