Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रजावळीत आर.पी.आय. गट पदे वाटप पण कार्यकर्त्यांचा दुष्काळ...

जावळीत आर.पी.आय. गट पदे वाटप पण कार्यकर्त्यांचा दुष्काळ…

(अजित जगताप )
कुडाळ दि: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याने जावळीकरांची गुणवत्ता सिद्ध झाले आहे. मेढा येथे नेत्र दीपक सत्कार सोहळा झाला. त्याच जावळीत आर.पी.आय. गटात पदाचे वाटप होते पण कार्यकर्त्यांचा दुष्काळ दिसून येतो. याबाबत आता आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. जावळी तालुक्यातील वाड्या वस्तीमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी नवीन कार्यकर्त्याची फळी तयार करणे गरजेचे आहे. त्या कार्यकर्त्याची गुणवत्ताही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
फुले- शाहू – आंबेडकरी विचाराचा वारसा जपणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गट तटामध्ये सामाजिक कार्याची झालर पूर्वी होती. आताही काही कार्यकर्ते यांना चळवळीचे बाळकडू मिळाल्यामुळे त्यांनी आपले अस्तित्व राखून ठेवले आहे. यामध्ये आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते डॉ. संपतराव कांबळे, संजय गाडे, उल्हास गायकवाड, योगेश कांबळे, सिद्धार्थ जाधव ,संगीता परिहार, आशालाता वाघमारे, विजय खरात, एकनाथ रोकडे, विजय गायकवाड, भीमराव भालेराव, किरण बगाडे, प्रशांत चव्हाण, सिद्धार्थ जगताप, विशाल कांबळे अशा अनेकांची नावे घेतली जातात. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून जावळी तालुक्यात लोक चळवळ उभी केली. सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने आर.पी.आय. गट नेहमीच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहे. अलीकडच्या काळामध्ये पक्षाची वाढ म्हणजे ओळखीने आला कार्यकर्ता की, त्याला आरपीआयचे पद दिले जात आहे.त्यामुळे असून अडचण,, नसून खोळंबा …याचा प्रत्यय आल्याचे सामान्य आर.पी.आय. कार्यकर्ते मनापासून सांगू लागले आहे.
सातारा जिल्ह्यात लोक चळवळ उभी करताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष सातारा जिल्ह्यातील अनेक आर.पी.आय. नेत्यांनी करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल राज्य पातळीवर सुद्धा घेतली जात आहे. ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही.
आज चळवळीमध्ये कुठलेही योगदान नसता नाही. लेटर पॅड व बॅनरबाजी साठी काही प्रसिद्धी ज्वालावीर वातावरण गरम करत आहे. तर काहींची तोडपाणी नूतनीकरण होत आहे.अशा कार्यकर्त्यांना बेन्टेक्स म्हटले जाते. हे बेन्टेक्स ओळखण्याची धमक चळवळीमध्ये राबलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. असे जुने कार्यकर्ते छातीठकपणाने सांगत आहेत.. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असल्यामुळे निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांनी आचारसंहिता लागू केली होती. आता महाराष्ट्र राज्यात आर.पी.आय. मध्ये पद वाटप करताना आचारसंहिता लागू करण्याची वेळ आलेली आहे .अशा शब्दात आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कारण निळा झेंडा बांधला म्हणजे कार्यकर्ता होत नाही तर त्यासाठी सामाजिक जाणीव असावी लागते याचाही त्यांनी पुनरुच्चार केले आहे त्याचीही जावली तालुक्यात चर्चा सुरू झालेली आहे. आरपीआय मध्ये कार्यकर्त्या वाढवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या नेत्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी. अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments