मुंबई (शांताराम गुडेकर) : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि भारतीय निर्यात संघटना महासंघ यांच्याद्वारे सेंट रेजिस हॉटेल, परेल येथे आंतरराष्ट्रीय खरेदीदार, विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे उदघाटन माननीय आमदार उदयजी सामंत (उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी केले. यावेळी विकास आयुक्त (उद्योग आणि निर्यात) दीपेंद्रसिंह कुशवाह (IAS) आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्रशाली दिघावकर उपस्थित होत्या.
या मेळाव्यात किमान ५० विविध देशातील विक्रेते आणि खरेदीदार यांच्याबरोबरच भारतातील वेगवेगळ्या राज्यातील उद्योजकही उपस्थित होते. याप्रसंगी १५०० च्या आसपास परदेशी व भारतीय आयात निर्यातदार यांच्या गाठीभेटी आणि चर्चा झाल्या. याचा फायदा नक्कीच या क्षेत्रात नव्यानं पदार्पण करणाऱ्या भारतीय निर्यातदारांना होईल असे मत मंत्री महोदयांनी व्यक्त केले.याच मेळाव्यात ए. के. मुनशी योजना संस्थेच्या जे. टी. शेठ मंदबुंदी विकास केंद्र या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींनी बनविलेल्या ज्युट बॅग्स सर्व परदेशी पाहुण्यांना भेट स्वरूपात देण्यात आल्या. यामुळे भविष्यात मंदबुद्धी विकास केंद्राच्या प्रशिक्षणार्थींना याचा फायदा होईल. असे मत ए. के. मुनशी योजना संस्थेच्या अध्यक्षा भारती गांजावाला यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या मेळाव्याचे विजन चेअरमन परेश मेहता यांच्या सहकार्याने ए. के. मुनशी योजना संस्थेस प्रतिनिधित्व मिळाले होते. जे. टी. शेठ मंदबुद्धी विकास केंद्राचे मुख्याध्यापक अजितकुमार चांगण यांनी भारतीय निर्यात संघटना महासंघ यांचे आभार व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय खरेदीदार व विक्रेता मेळावा मुंबईत संपन्न
RELATED ARTICLES