मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी ₹1,11,111 चा धनादेश सुपूर्द केला.तसेच, पुढील संघटनांनीही निधीसाठी देणगी दिली. अण्णासाहेब पाटील माथाडी पतपेढी मर्यादित – ₹11,11,111, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) – ₹1,11,111, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी मर्यादित – ₹5,55,555
या सर्व देणग्यांचे धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे औपचारिक कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामाजिक कार्याबद्दल स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या संघटनेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या भगिनी सौ भारती पाटील रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यांचे संस्था, युनियन व पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.