प्रतिनिधी : गोकुळ अष्टमी आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नवीन शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व, मुंबई – ५१ येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक – गुरुवर्य ह.भ.प. श्री रामेश्वर महाराज शास्त्री, संस्थापक अध्यक्ष
कार्यक्रम अनुक्रमे – सकाळी ७.०० – महापूजा (मान्यवरांच्या हस्ते) सकाळी ८.०० – महाआरती, सकाळी ८.३० – चहापान, सायंकाळी ४.०० – आषाढी महोत्सव २०२५ च्या स्मरणिकेचे प्रकाशन, सायंकाळी ४.३० ते ७.०० – श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक (ज्ञानेश्वर मंदिर ते हनुमान मंदिर ते गणपती मंदिर, वाय टाईप कॉलनी, विसावा आणि पुन्हा मंदिर), रात्री ८.०० – हरिपाठ, रात्री ९.०० ते १०.०० – महिला मंडळींचे श्रीकृष्ण जन्मोत्सव पाळणा व भजन, रात्री १०.०० ते ११.३० – भजन, रात्री १२.०० – श्रीकृष्ण जन्मोत्सव, शनिवार, १६ ऑगस्ट २०२५, सकाळी ९.०० – दहिकाला कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद चालू करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तगणांनी या पवित्र उत्सवात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. यंदाची उत्सव समिती – २०२५
जयंतराव वाणी, लक्ष्मीकांत ढोके, नितीन सवडतकर, भूषण देशपांडे, जीवन कडू, अमरनाथ खुळे, प्रशांत पाटील, रविंद्र दिवाण, उद्वव दहिफळे, दिवाकर परांजपे, अभय देशमुख, हेमंत लेदाडे, राहुल बन, अरुण जाधव, संदीप पोरे, विनायक कोहाड, विजयकुमार शेट्टी, रजणीकांत जाधव, गोविंद डोंबाळे, अजित पोवार, रविंद्र गोटे, अशोक सानप, निलेश जाधव, ह.भ.प. प्रमोद खामकर, ह.भ.प. यादव बुवा, बाबासाहेब वक्ते, विरेंद्र ठाकूर, मनोज भातणकर, डॉ. किशोर कुशाले, अनिल सावरे, मुक्तेश्वर छडीदार, ज्योतिराम भोजने, मगदूम महाराज, महेश जाधव, जगन्नाथ लांडगे, निलेशचंद चौधरी पाटील, स्थानिक रहिवासी, दुकानदार, व्यावसायिक, श्री वारकरी प्रबोधन महासमिती मुंबई, महाराष्ट्र वारकरी मंडळ बांद्रा मुंबई अशी आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.