Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भहिंगोली येथील कावड यात्रेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिंदुत्वाचा जागर

हिंगोली येथील कावड यात्रेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिंदुत्वाचा जागर

प्रतिनिधी : कावड यात्रा ही फक्त हिंदू धर्माची परंपरा नाही, तर ती आपल्या सनातनी हिंदू धर्माचे प्रतीक आहे. म्हणून तर दरवर्षी शिवभक्त हजारो किलोमीटर चालून पवित्र गंगाजल आणून शिवशंकरावर अर्पण करतात. यात त्याग, समर्पण आणि एकजुटीची भावना आहे. भगवान शंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत होते. त्यामुळे शिवसेनेच्या नावातच ‘शिव’ आहे आणि ही संघटना दिवसरात्र सर्वसामान्य माणसासाठी झटणारी संघटना आहे. आणि काँग्रेसच्या जोखडाला बांधलेली ही संघटना सोडविण्याचे काम अम्ही सर्वांनी मिळून केले त्यांचा मला सार्थ अभिमान असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. हिंगोली येथे आयोजित केलेल्या भव्य कावड यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

या समारोप सोहळ्याला कावड यात्रेचे मुख्य आयोजक हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार हिकमत उढाण, बालाजी पाटील खतगावकर आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे यांनी, याआधी काही जणांना या कावड यात्रेसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी या यात्रेला येणे टाळले,
ज्यांनी या कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचे सगळे पालथे झाले. जेव्हा आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला, तेव्हा संतोष बांगरला फोन केला, म्हणालो तू बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्वाचा शिपाई आहेस, त्याने लगेच मागचा पुढचा काहीही विचार न करता सोबत येण्याचा निर्णय घेतला. ५० आमदारानी माझी साथ दिली आणि ‘ ऑपरेशन तख्तापालट’ यशस्वी करून दाखवले.

माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी कधीही निधी देताना हात आखडता घेतला नाही पत्रावर किती रक्कम आहे ती कधी पाहिली नाही विकासाचे काम असेल तर तत्काळ त्या पत्रावर सही करून विकासनिधी मंजूर केला. २ हजार ६०० कोटी तुमच्या या संतोष बांगरला दिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात ४५० कोटी रुपये दिले. आधीचे मुख्यमंत्री पेन सोबत ठेवत नव्हते माझ्याकडे दोन दोन पेन होते शाई कधी संपायची तेही मला कळायचे नाही.

अडीच वर्षात अनेक विकमकामे केली लाडकी बहिण योजना आणली त्यातून महिलाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले. आज कुणी कितीही अफवा पसरवू देत, खोटे नाते बोलू देत मात्र लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही असे सांगितले.

दहशतवादाला कोणता धर्म नसतो, रंग नसतो म्हणणारे मालेगाव बॉम्बस्फोटानंतर मात्र म्हणाले की हा भगवा दहशतवाद आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यासाठी त्रास देण्यात आला जेणेकरून हा भगवा दहशतवाद आहे हे सिद्ध होऊ शकेल. मतांसाठी अजून किती लाचार होणार..? ऑपरेशन सिन्दुर द्वारे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात आले. मात्र त्यात किती दहशतवादी गेले ते नाही विचारत, विचारतात की त्यात किती विमाने पडली, किती ड्रॉन पडले ते सांगा. आज सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीला सणसणीत चपराक हाणली आहे आता तरी सुधारतील का माहिती नाही..? हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे, हिंदू हा कायम सहिष्णू असतो, हिंदुत्वाला बदनाम करण्याचे पाप तुम्ही केले आहे तमाम हिंदू भक्त तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे निक्षून सांगितले.

दहशतवाद्यांचा खात्मा करायला ऑपरेशन महादेव केले, तिसरा डोळा उघडून दुष्टांना भस्मसात केले, तरीही
ऑपरेशन महादेव नाव का दिले असे प्रश्न विचारत आहेत, हे दुर्दैव आहे.

शिवरायांचा भगवा दहशतवादाचा आहे का.?, वारकऱ्यांचा भगवा दहशतवादाचा आहे का.?, प्रभु रामचंद्राचा भगवा दहशतवादाचा आहे का.?, त्यामुळे मराठवाड्यातील संतांनी जो भगवा देशाच्या कानाकोपऱ्यात नेला त्याला दहशतवादाचा रंग देण्याचे पाप तुम्ही केले आहे. त्यामुळे दहशतवादाचा नव्हे तर विकासाचा, प्रगतीचा आणि तुमचा आणि माझा रंग भगवा आहे असे निक्षून सांगितले.

*स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीसाठी सज्ज व्हा*

देश जिंकला, राज्य जिंकले, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत, महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती, या सर्व निवडणुका आपल्याला एकजुटीने जिंकायच्या असल्याचे आवाहन केले.

*आदिवासी समाजाच्या नेत्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन*

हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव गेल्या काही दिवसापासून आपल्या मागण्यासाठी उपोषण करत आहेत. त्याची दखल घेऊन, आदिवासी समाजाच्या मागण्या, अधिसंंख्य पदांचे आणि रिक्त पदांचा प्रश्न नक्की सोडवू असे सांगितले. तसेच या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असेही जाहीर केले. मात्र त्यापूर्वी या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments