प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने राज्यात ९ ऑगस्ट पासून ओबीसींसाठी मंडल जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून नागपूर येथून सुरुवात करण्यात येणार आहे. पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा विदर्भात असणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, मागासवर्गीयांचा खरा जनक कोण आहेत तर डॉ. बाबाासाहेब आंबेडकर. आत्तापर्यंत अनेक आयोग येऊन गेले. पण शेवटचा आयोग आला तो म्हणजे बीपी आयोग आणि मंडळ आयोग हे इतर मागासवर्गीयांचे विश्वनाथ प्रताप सिंह यांनी तो अहवाल स्विकारला आणि त्यांच्या आरक्षणाला पहिल्यांदा मान्यता दिली. असे जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की,ओबीसी समाजाला अधिकृत व हक्काचे आरक्षण मिळून दिले. शिक्षण, नोकरी सोबतच राजकीय आरक्षणाच्या माध्यमातुन ओबीसी समाजातील तरुण-तरुणींना नगराध्यक्ष, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, महापौर बनण्याची संधी स्थानिक स्वराज संस्थांच्या स्वरुपातुन मिळाली. दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी भाजपाने कमंडल यात्रा काढली होती. भाजपा नेहमीच ओबीसी समाजाच्या विरोधात राहली आहे. पण, १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांच्याच कारकीर्दीत मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी म्हणजे जवळजवळ ४० वर्ष ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळविण्यास लागली. ओबीसींच्या जीवनात आमूलाग्र बदल मंडल आयोगाच्या शिफारशींच्याअंमलबलावणीमुळे झाले. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,ओबीसी समाजाला अधिकृत व हक्काचे आरक्षण मिळून दिले. शिक्षण, नोकरी सोबतच राजकीय आरक्षणाच्या माध्यमातुन ओबीसी समाजातील तरुण-तरुणींना नगराध्यक्ष, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, महापौर बनण्याची संधी स्थानिक स्वराज संस्थांच्या स्वरुपातुन मिळाली. भाजपने नेहमीच ओबीसीला आरक्षणापासून वंचित केले पण सर्वोच्च न्यायालयाने सर्व मार्ग खुले केले आहेत. आरक्षणातून पुढच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असे न्यायालयाने सांगितले. पण तीन वर्षे वाया गेले. सरकारने मुद्दाम तीन वर्ष वाया घालवले असे जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, इतर मागासवर्गीयांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे आपल्या जाती नोंदवा असे आवाहन देखील आव्हाड यांनी यावेळी केले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी सेलच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वात राज्यभर येत्या ९ तारखेपासून मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ११ जिल्हात ही यात्रा काढण्यात येणार आहे.