म
ुंबई (शांताराम गुडेकर /दिपक मांडवकर) : विरार भाऊसाहेब वर्तक हॉल येथे रविवारी अनाथांच्या नाथांचा अद्भूत सोहळा संपन्न झाला.रेल्वे प्रवसी प्रगती मित्र मंडळाच्या माध्यमातून दर वर्षी जनसेवेचे दर्शन घडते.तसेच या वेळी रविवारी (दि. ३ ऑगस्ट) रोजी भाऊसाहेब वर्तक हॉल येथे मनोरंजनातून अनाथांचे संगोपन असा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरवातीला मंडळाचे वरिष्ठ ऍड.श्री. दिनेश शिंदे यांनी रंगदेवतेला श्रीफळ वाढवून सुरवात केली. तर मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शन श्री. कृष्णा शिगवण यांनी आई जीवदानीला श्रीफळ अर्पण केला.त्या प्रमाणे प्रगती मित्र मंडळाला सातत्याने लाभलेले प्रमुख देणगीदार व अनाथांचे नातं म्हणून विधी ज्वेलर्सचे मालक श्री.परशुराम पारावे यांनी दीपप्रज्वलन करून सुरवात केली.तर आर.व्ही फिटनेसचे संस्थापक श्री.परशुराम वाघरे व त्यांचे चिरंजीव कु.ऋषी वाघरे व कु. वैभव वाघरे यांनी देखील दीपप्रज्वलन केले.कु.ऋषी वाघरे यांच्या हस्ते गणरायाची पूजा करून मंडळाचे तरुण प्रेरणा स्थान म्हणून युवक कु.सुरेंद्र कुडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला.मंडळाचे प्रेरणा स्थान कै.किसन् काका याना श्री.मंगेश गोरीवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाच्या सुरवातीला वीरशहीद जवानांना मानवंदना दिली. तर मंडळाचे प्रेरणा स्थान कै.किसन काका दुर्गावले व नुकतेच निधन झालेले कै.राऊत काका याना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली.
रेल्वे प्रवशी प्रगती मित्र मंडळाच्या उद्धिष्ट प्रमाणे अनाथ अपंग कर्णबधिर निराधार बालकांना व रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजना करीता कोकणातील शक्ती – तुरा या कार्यक्रमाचे आयोजन करून रसिकांच्या मनोरंजनातून मिळालेला निधी या मुलांना आर्थिक मदत म्हणून त्याच ठिकाणी देण्यात आला. प्रामुख्याने मुलांच्या सोबत पालक देखील उपस्थित होते.सुरवाती पासून शक्ती वाल्या शाहीर सौ.वृदाली दळवी व तुरेवाले शाहीर श्री.रत्नाकर महाकाळ यांनी रसिक जनाचे मनोरंजन केले.त्यात भर परडी ती शक्ती- तुरा डबल बारीचे बादशहा शाहीर श्री.रामचंद्र घाणेकर यांनी देखील एक गाणे गाऊन रसिक जनाना मोहित केले.
विशेषतः या कार्यक्रमात नालासोपारा विधानसभा आमदार श्री.राजन नाईक साहेब व बहुजन विकास आघाडीचे युवा नेतृत्व श्री.सिद्धार्थ ठाकूर साहेब यांचे हस्ते या मुलांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मंत्रालय कार्यकारी अधिकारी( SOD )श्री.योगेश पाटील साहेब, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे संपादक श्री. जितेंद्र शिंदे,श्री लवेश लोखंडे,श्री. जगन्नाथ चौगुले, श्री.शरद चौगुले, डॉ.संजय जाधव,दिपकजी ओरा, श्रीरंग पाटील, रुग्णसेवक श्री.साई सर, श्री. खैरे सर, कुणबी युवा विरार अध्यक्ष श्री. किशोर भेरे साहेब व सहकारी असे पन्नास पेक्षा जास्त मान्यवरांच्या हस्ते मुलाना मदत करून सन्मान केला.आमदार श्री.राजन नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना बोलले की, देणगी जमा करून अनाथ व गरजू मुलांना आपण मदत करता असे कोणते मंडळ मी आजवर पाहिले नाही. तर या पुढे कोणत्याही मदती साठी आम्ही सदैव सोबत असल्याचे बोलून सर्वांचे आभार मानले. श्री. सिद्धार्थ दादा ठाकूर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पुढील वेळी या हॉलचे दुरुस्ती करून थेटर उभारू व मंडळाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे अध्यक्ष श्री.मनोहर गोताड साहेब यांनी सर्व मुलांचे,मान्यवरांचे, रसिकांचे व मंडळाचे सदस्य यांचे आभार मानले.या भव्यदिव्य कार्यक्रमाचे यश हे सदस्यांच्या मेहनतीचे फळ असुन सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.