मुंबई(रमेश औताडे) : गोरक्षणाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या गटांकडून कुरेशी व्यापारी व जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार सुरू असल्यामुळे सामाजिक तणाव व आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गांभिर्याने विचार करून या घटकाला न्याय द्यावा. अशी मागणी मुंबई प्रेस क्लब येथे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स संघटनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत केली.
बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी. कायदेशीर संरक्षण मवेशी वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जावं. खोटे गुन्हे मागे घेणे लादलेले खोटे गुन्हे, हद्दपारीचे आदेश, एमपीडीए सारख्या कायद्यांतर्गत दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. कसाईखाने नियमित करणे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कसाईखाने समित्या स्थापन कराव्यात. वाहतूक परवाने सुलभ करणे जनावरे वाहतूक परवान्यांची प्रक्रिया सुलभ व त्रासमुक्त करावी. शेतकऱ्यांना मदत – संपामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी व विमा संरक्षण द्यावे.
यावेळी मौलाना मेहमूद दर्याबादी, जहीर अब्बास रिजवी, फरीद शेख, ॲड. मजीद कुरेशी, शाकीर शेख, अब्दुल मुजीब शेख, कासीम अहमद, यावेळी उपस्थित होते. सरकारने गांभिर्याने विचार केला नाही तर अन्यायाच्या निषेधार्थ कुरेशी समाजाने दिनांक ६ जूनपासून संप पुकारला आहे.