कर्जत नेरळ(भास्कर तरे) : नेरळ, ३ आँगस्ट २०२५- समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी १०-१२ इयत्तेत ८० टक्केहून अधिक गुण प्राप्त झालेल्या मुलांचा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी गौरव करण्यात येतो. यंदा या सोहळ्याला पाहुणे म्हणून ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, वामन म्हात्रे, बदलापूर नगरपरिषदेचे माजी महापौर, शरद म्हात्रे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल आगरी समाज, गावठाण बचावचे जयेंद्र खुणे, नवीन भोपी, जनसंपर्क अधिकारी, आयटीआय मुलूंड आदी मान्यवरांसह इतिहास संशोधक वसंत कोळंबे, भरत भगत, सावळाराम जाधव, अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात ८४ गांवामध्ये मोठ्या संख्येने आगरी समाज प्रस्थापित असून स्वांतत्र्य लढयात बलिदान देणारा समाज म्हणून इतिहासात नोंद आणि योगदान आहे. आज याप्रसंगी समाजातील अनेक विद्यार्थांना परिस्थिती अथवा योग्य मार्गदर्शनाभावी शिक्षण घेता येत नाही म्हणून कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वास्तूत अभ्यासिका आणि वस्तीशाळा सुरू करण्याचा मानस असून याव्दारे स्पर्धापरिक्षेची तयारी विद्यार्थांना करता येईल व येणा-या काळात अधिकाधिक विद्यार्थांना या संधीचा लाभ घेता येईल. तसेच, संघटनेची वास्तू वातानुकूलीत करून विविध कार्यक्रमांसाठी लागणारे कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी मान्यवरांकडे व्यक्त करताच खासदार पाटील व वामन म्हात्रे यांनी शासकीय निधीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच समाजातील नामवंत व्यक्तिंकडे आपण सढळहस्ते मदतीचे आवाहन करून ही वास्तू आणि वस्तीशाळा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करू. तसेच याप्रसंगी इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय नेते महेंद्र घरत यांनी सढळहस्ते रोख रक्कम १० लाख जाहीर केले आणि नंतर काम सुरू करतेवेळी २५ लाख देण्याचेही आश्वासन यावेळी दिले.
खासदार संयज दिना पाटील यांची कन्या राजूल संजय पाटील यांच्यातर्फे १२ वीत समाजातून सर्वाधीक गुण प्राप्त करणा-या दोन विद्यार्थांना लँपटाँप देऊन गौरविण्यात आले तसेच ही परंपरा कायमस्वरूपी सुरू राहील अशी ग्वाही यावेळी दिली. याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की, मी आगरी ही माहीम प्रत्येकाने राबवणे आवश्यक असून मीही आजपासून माझ्या घरा-या दारावर ही पाटी लावणार आहे आणि आपण या समाजात जन्माला आलो याचा नेहमी अभिमानच असायला हवं. तसेच, समाजातील प्रत्येकाने आपले दायित्व समजून आपल्या समाजाला सढळहस्ते मदत केली पाहिजे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष वामन म्हात्रे यांनी त्यांचा इथवरचा प्रवास किती खडतर होता याबाबत विद्यार्यांना मार्गदर्शन केले तसेच शासनाव्दारे ६ कोटी निधी आणून बदलापूर येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू केली. आपण आगरी असल्याची लाज न बाळगता आपली संस्कृती आणि परंपरा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसेच, ज्या समाजातून, गावातून आपण पुढे जाते त्याचे काहीतरी देणे लागते ही जाणून प्रत्येक विद्यार्थांला हवी. आम्ही बदलापूरमध्ये प्रत्येक नगरसेवक हा आगरी समाजाचा असावा यासाठी आग्रही असतो मग तो कोणत्याही पक्षाचा असू दया पण त्यासाठी पुर्णतहा प्रयत्न करतो. तसेच, विद्यार्थांनी मोबाईलचा उपयोग हा सोशल मिडीयासाठी न करता आपले सामान्य ज्ञा वाढविण्यासाठी करावे हा मोलाचा सल्ला दिला.
याप्रसंगी संघटनेच्या वतीने तालुक्यातील १६० विद्यार्थाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक, युवा तरूण आणि समाजबांधव उपस्थित होता. ही परंपरा गेल्या ३०वर्षाहून अधिक काळ सुरू असून येणा-या काळात समाजातील युवा तरूण हा प्रत्येक क्षेत्रात अग्रणीय असावा असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.