Sunday, August 3, 2025
घरदेश आणि विदेशदेशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा

प्रतिनिधी ~ देशभरातील सर्व दलितांनी एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा.विविध दलितांच्या ऐक्यातून मजबूत होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद बहन मायावती यांनी स्वीकारावे असे राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिकन ऐक्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज आगरा येथे केले.
आगरा येथील
सुरसदन सभागृहात उत्तर प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्या आला होता.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.
मायावती यांनी उत्तर प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री पद भूषविले आहे.त्या आज देशात सर्वात वरिष्ठ दलित नेत्या आहेत.त्यांना मुख्यमंत्री करण्यात मान्यवर कांशीराम यांचे मोठे योगदान आहे.उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी सामाजिक क्रांतीसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण असून त्यांचा आम्ही आदर करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी देशभरातील दलितांनी एकजूट उभारणे गरजेचे असून देशभरातील रिपब्लिकन ऐक्याचे राष्ट्रीय नेतृत्व मायावती यांनी करावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी आज केले.
आगरा हा आंबेडकरवाद्यांचा बालेकिल्ला आहे.आगरा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य प्रमाणात साजरी केली जाते. आगरा येथेच देशात जयभीम चा नारा पहिल्यांदा बुलंद करण्यात आला होता.दलितांनी सामाजिक एकजुटी सोबत राजकीय एकजूट उभारली पाहिजे असे मत न.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशात आता बसपा चा केवळ एक आमदार आणि एक खासदार आहे.बसपा चा राजकीय करिष्मा लोपला आहे.त्यामुळे उत्तर प्रदेशातील बसपा कार्यकर्त्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हाती घ्यावा.उत्तर प्रदेशात जेव्हा चौधरी चरण सिंह यांचे सरकार होते तेव्हा उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे 4 आमदार निवडून आले होते.आता आगामी काळात उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे किमान 5 आमदार निवडून आणू असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments