Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम), नागपूर येथे दोन दिवसीय ‘महसूल परिषदे’चा समारोप झाला.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महसूल विभाग खऱ्या अर्थाने राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता आणि तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून ओळखला जातो. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा विभाग म्हणूनही याची ओळख आहे. अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णयांसाठी दिशादर्शक ठरतील.

कालानुरूप महसूल विषयक कार्यप्रणालीशी संबंधित धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून तंत्रकौशल्याच्या बळावर हा विभाग अधिक सक्षम व लोकस्नेही करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जात आहे. महसुली सेवा व योजनांच्या लाभांपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यासोबतच त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण बाबी सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. या विषयाचा शासनास सादर करण्यात येणारा अहवाल अचूक व निर्दोष असावा, यासाठी प्रत्येक बाबींचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments