Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रउबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

ाणे :- मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज ठाणे येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती. देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी त्यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली.

यावेळी त्यांच्यासह, शाखा संघटीका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटीका नंदा
पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना शिंदे यांनी, मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिधी आजही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. पक्षप्रवेशांचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही.
रामदास कांबळे यांच्या मतदारसंघात संक्रमण शिबिरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित आहेत, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते शिवसेनेसोबत आले असून शासनाच्या माध्यमातून हे प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे यावेळी जाहीर केले.

गेल्या अडीच वर्षाचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, काँक्रिट रस्ते, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला असून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी अम्ही काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू असे यावेळी बोलताना नमूद केले.

यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments