कुडाळ (अजित जगताप) : आर.पी.आय ( ए गट) पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी धडाडीचे कार्यकर्ते श्री संग्राम रोकडे यांची आज मोठ्या धुमधडाक्यात नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्र मध्ये आर.पी.आय.( ए गट)ची ताकद वाढली आहे.
आज सातारा येथील आर.पी.आय.( ए गट ) सातारा जिल्हा कार्यालयामध्ये राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ व तालुका अध्यक्ष विजय ओव्हाळ आणि विनोद तथा बाबा ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार अजित जगताप, वासिम शेख व दत्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनगाव तालुका जावळी गावचे सुपुत्र असलेल्या श्री संग्राम रोकडे यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला या वेळेला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत केले. लवकरच वाहतूक आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती आजू उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हळ यांनी दिली आहे .
____________________________
फोटो — आरपीआय ए गट सातारा जिल्हा कार्यालयात श्री संग्राम रोकडे यांचे स्वागत करताना पदाधिकारी (छाया– निनाद जगताप सातारा)