बीड (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध कीर्तनकार, जेष्ठ पत्रकार तथा संवेदनशील कवी ह. भ. प. श शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील आध्यात्मिक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानचे वतीने मोहन गुंड यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अध्यात्मिक कार्यासाठी दिला जाणारा प्रबोधन पुरस्कार यावर्षी शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर झाला आहे. शामसुंदर महाराज कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नावर भाष्य करतात. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत करणे स्त्री भ्रूणहत्ये विरोधात जागृती करणे, कैद्याचे समुपदेशन करणे असे प्रबोधनात्मक उपक्रम शामसुंदर महाराज राबवित असतात. सध्या ते कीर्तनातून संविधानाचा जागर करीत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांची संविधान दिंडी असते. त्यांच्या या प्रबोधनकार्याची दखल घेऊन त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.
शामसुंदर महाराज सोन्नर यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार
RELATED ARTICLES