Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्था, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा फकीरांच्या स्मारकाजवळ, वाटेगाव येथे पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना “समाजभूषण पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा येथील अनिकेत लालासो साळुंखे यांना फकीरा रानोजी साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील सुपुत्र अंकुश रघुनाथ कांबळे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुद्धिजीवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यामुळे सामाजिक क्षेत्रातील कार्याला नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
माजी आमदार राजू आवळे साहेब फकीराचे वंश सौरभ साठे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष मा.पिराज थोरवडे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले
त्यापसंगी सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तम माने पिराजी थोरवडे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनीष पिराजी थोरवडे,फकिरा पँथर सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments