Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रश्री निनाई देवी विद्यालय तुळसण येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न......

श्री निनाई देवी विद्यालय तुळसण येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न……

प्रतिनिधी : संत कृपा इंजिनिअरिंग कॉलेज घोगाव व श्री निनाई देवी विद्यालय यांच्यावतीने आज विद्यालयाच्या प्रांगणात आपटा, बेल, बदाम, अशोक यांचे वृक्षारोपण करण्यात आले.
संत कृपा कॉलेजचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपल्याला भविष्यात सांभाळेल. कारण आज आपण सर्वत्र प्रदूषणाचे विविध दुष्परिणाम पाहत आहोत. सुनामी, भूकंप, महापूर, ढगफुटी सारखे अनेक नैसर्गिक आपत्तींना आपणास तोंड द्यावे लागत आहे याचे प्रमुख कारण होणारी वृक्षतोड आहे.
संत तुकाराम महाराज यांनी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे याप्रमाणे आपल्याला निसर्ग संपदा जपावी लागेल. वृक्ष आपल्याला अनेक गोष्टी देतात. फळे, लाकूड, लोकांना जगण्याचे साधन सुद्धा वृक्ष देतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानवाला जगण्यासाठी महत्त्वाचे लागणारे पाणी सुद्धा निसर्गाच्या माध्यमातूनच आपणास उपलब्ध होते.
त्यामुळे सर्वांनी वृक्ष लागवड करावी, झाडे जतन करावी म्हणजे निसर्ग आपल्याला सोबत करेल.
यावेळी कल्याण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गणेश पवार, लालासो पाटील, आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर, संत कृपा कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments