मुंबई(रमेश औताडे) : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने अखेर २०२५ आकाश राष्ट्रीय हुशार विद्यार्थी परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा ८ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी असून, नीट जे ई ई , राज्य सी ई टी, एन टी एस सी आणि ऑलिंपियाड्ससाठी मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती व रुपये २६.४ कोटींपर्यंत बक्षिसे दिली जातील. असे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचे सीईओ दीपक मेहरोत्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात परीक्षा २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान होणार असून शुल्क ३०० आहे. अर्ज www.anthe.aakash.ac.in या संकेतस्थळावर सुरु आहेत.
अखेर परीक्षेत चांगल्या कामगिरीने आय आय टी व नामवंत इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेशासाठी मार्ग मोकळा होतो. आकाश डिजिटल 2.0 व आकाश आय ए की एस टी ही ए आय आधारित तयारीची नवी साधनेही उपलब्ध आहेत.
अखेर २०२५ परीक्षेचा निकाल ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर होणार असून, ५ वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार प्रश्नपत्रिका असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या वेळेस ऑनलाइन परीक्षा देता येणार असून, ऑफलाइन परीक्षा भारतातील २६ राज्यांतील ४१५ हून अधिक केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक दिशा ठरवण्यासाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.