तासगाव(विजय जाधव) : ग्रामपंचायतचे कार्यकाज हे नियोजनबद्ध, पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत राहून चालविण्यासाठी सरपंच, सदस्यांना कायदेशीर तरतुदी, अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, कामे , सध्या ऑनलाईन कामकाजाबाबत माहिती असणे, आवश्यक आहे.यासाठी तासगाव तालुक्यातील सरपंच, सदस्यांसाठी दि. ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले.
पुणे विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार सांगली जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र व तासगाव पंचायत समितीने “ओळख ग्रामपंचायत कामकाजाची”
ही कार्यशाळा पद्मभूषण डॉ. वसंतराव दादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथील सभागृहात होणार आहे. याच महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायत अधिनियमातील महत्त्वाची कलमे, सभा कामकाज , लेखा संहिता, नमुने १ ते ३३, शासकीय योजनांची अंमलबजावणी, ग्राम समित्यांची रचना, ऑनलाईन कामकाजाचे तंत्रज्ञान, कर आकारणी आणि वसुली, सरपंच आणि सदस्यांचे अधिकार,कामे, जबाबदाऱ्या , कर्तव्ये याविषयी विषय तज्ञ सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
या गावांना होणार प्रशिक्षण
अंजनी, आरवडे, बलगवडे, बेंद्री, भैरववाडी, खुजगाव, कुमठे, लिंब, नागाव (नि), पानमळेवाडी, सावर्डे, उपळावी, वायफळे, चिंचणी, कचरेवाडी, मणेराजुरी, मतकुणकी, नागेवाडी, नेहरूनगर, निमणी, पुणदी (ता.), शिरगांव (क), वंजारवाडी, वासुंबे, योगेवाडी, बिरणवाडी, चिखलगोठण.