Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रयेळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक संपन्न

येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक संपन्न

प्रतिनिधी : येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घोगाव येथील एका रिसॉर्टमध्ये संपन्न झाली.या बैठकीचे आयोजन सरपंच अर्जुन शेवाळे, समाजसेवक दीपक शेठ लोखंडे, माजी चेअरमन नारायण साळुंखे, तसेच कराड दक्षिण काँग्रेसचे सरचिटणीस मा. उदय पाटील (आबा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.या बैठकीस प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेनंतर प्रथमच कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती, त्यामुळे उत्साहासह सर्वांनी उपस्थित राहून आपल्या भावना, अडचणी व पुढील वाटचालीबाबत आपली मते मांडली.बैठकीत सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जो आदेश असेल, तो संपूर्ण संघटनेने मान्य करून त्यानुसारच पुढील राजकीय वाटचाल केली जाईल. कोणताही कार्यकर्ता स्वतंत्रपणे वैयक्तिक निर्णय घेणार नाही आणि सर्वजण संघशक्तीनेच काम करतील, असा ठाम निर्धार या वेळी करण्यात आला.ही बैठक संघटनात्मक दृढतेचा संदेश देणारी ठरली असून आगामी काळातील काँग्रेसच्या रणनीतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments