मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) : वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे आज आयोजित केलेल्या एका सामाजिक सत्कार समारंभात कोकण एनजीओ इंडियाला गरजू व वैद्यकीय दृष्ट्या संकटात असलेल्या घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले. गेल्या १३ वर्षांपासून संस्था गरजू रुग्णांसाठी, विशेषतः जीवघेण्या आजाराने ग्रस्त मुलांसाठी, अहोरात्र झटत आहे.आज पर्यंत संस्थेने अनेक समाजपयोगी, शैक्षणिक उपक्रमातून लाखो लोकांना मदत पोहोचवली असून संस्थेला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी याआधीही सन्मानित करण्यात आले आहे.
आज झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे श्री. सूरज कदम आणि कु. स्वाती नलावडे यांनी कोकण एनजीओ इंडियाच्यावतीने हा सन्मान स्वीकृत केला. “सामाजिक सेवेचा सन्मान ” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम आज येथे आयोजित करण्यात आला होता.
कोकण एनजीओ इंडिया ही संस्था गेल्या दशकभरात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेकडो मुलांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाली असून, २०३० पर्यंत ३० लाख गरजू लोकांची सेवा करण्याचे उद्दिष्ट संस्थेने निश्चित केले आहे.वॉकहार्ट हॉस्पिटल्सने कोकण संस्थेच्या सेवाभावी वृत्ती, बांधिलकी व समर्पणाचे विशेष कौतुक केले आणि अशा कार्यामुळे आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे नमूद केले.
आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कोकण संस्था मुंबईत सन्मानित
RELATED ARTICLES