Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रशिक्षणासाठी झगडणाऱ्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

शिक्षणासाठी झगडणाऱ्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्र भारती यांच्या वतीने दहावी व बारावीच्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात १०० हून अधिक रात्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (बॕग,वह्या,पाणी बॉटल, कंपासपेटी) व रोख रक्कम म्हणून देण्यात आले. मॉर्निंग वॉकिंग ग्रुपचे प्रमुख सुभाष भाई आणि सुमनबाई यांच्या तर्फे हे शैक्षणिक साहित्य देणगी म्हणून देण्यात आले होते. समाजवादी नेते माजी आमदार साथी कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लोककवी अरुण म्हात्रे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रा. जयवंत पाटील आणि राज्याध्यक्ष राजा कांदळकर, रात्रशाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे आणि छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय डी.एन. त्रिवेदी, एस. वाय. देशपांडे, डी. एस. पवार, जी. टी. पाटील, माताचरण मिश्रा हे ज्येष्ठ पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे शिवाजी खैरमोडे, राधिका महांकाळ, दत्तात्रेय सोनवणे, अमोल गंगावणे, रवी कांबळे, सचिन काकड, विकास पटेकर, चेतन पाटील इ. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा कदम यांनी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments