Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रमुलुंड येथे "ओळख कोकणातील रानभाज्यांची " महोत्सवाचे आयोजन

मुलुंड येथे “ओळख कोकणातील रानभाज्यांची ” महोत्सवाचे आयोजन

मुंबई(पी.डी. पाटील): “मराठमोळं मुलुंड” आणि “महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग”ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मुलुंड हायस्कूल हॉल, युनियन बँक (जुनी- आन्ध्र बँकेच्या जवळ), चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड (पश्चिम) याठिकाणी सकाळी १०:००ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत “रानभाज्या,कडधान्य व तृणधान्य (मिलेट) महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.
पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट),कडधान्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागा बरोबर रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजन केले आहे.
मराठमोळं मुलुंड संस्थेने वर्ष २०२१- २२ – २३ – २४ मध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते व त्यास मुलुंडकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. तेव्हा मुलुंडमधील सर्वच नागरिकांना विनंती आहे की त्यांनी याही वर्षी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आदिवासी बांधवांना त्यांच्या उपजीविके करिता हातभार लावावा, असे आवाहन आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments