मेष:- आज अत्यंत आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. मित्रमंडळींसोबत धमाल करणार आहात. लेखकांना चांगला कालावधी आहे. तुमच्या हातून शुभ कार्य घडणार आहे.
वृषभ:- तुम्ही स्वभावाने शांत आहात. कलेची आवड आहे. आज तुमच्यातील कलाकाराला प्रोत्साहन मिळेल. व्यवसाय वाढेल. पत्रकारांना किंवा राजकीय लेखकांना आज विशेष लाभ मिळणार आहेत. भौतिक सुखे आणि विरक्ती यात मन दोलायमान होईल.
मिथुन:- मन आनंदी करणारे ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. तुमच्या राशीतील शुक्राचा पंचमातील चंद्राशी त्रिकोण योग आहे. आज मौज करण्याचा दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. महिलांना भेटवस्तू मिळतील. छोटी सहल घडेल.
कर्क:- चतुर्थ चंद्र आहे. ग्रहांचे पाठबळ मिळत आहे. त्याचा लाभ घ्या. आनंदी राहाल. तुम्हाला राजकारणात फारसा रस नसतो मात्र आज तुमची सरकार दरबारी कामे होतील. तुमचा सल्ला इतरांना मोलाचा ठरेल. गृह सजावट कराल. नवीन वाहन खरेदी होऊ शकते.
सिंह:- उद्योग- व्यवसाय वाढणार आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. बहुतेक सुखे प्रपात होतील. राजकारणात रस निर्माण होईल. सरकारी कामे रेंगाळतील.
कन्या:- रवी – बुध अनुकूल आहेत. भाग्योदय होईल. लक्ष्मी प्रसन्न राहील. मान सन्मान मिळतील. आज वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यास चांगला दिवस आहे. महिलांना नोकरीच्या ठिकाणी उत्तम सहकार्य लाभेल. वाहन सौख्य मिळेल.
तुळ:- दिवसाची सुरुवात फारशी अनुकूल नसली तरी तुमच्याच राशीत दुपार नंतर चंद्र आहे. कुलदेवतेची कृपा दृष्टी राहणार आहे. सहल घडेल. प्रिय व्यक्ती भेटेल. नोकरीच्या ठिकणी तुकचे कौतुक होऊ शकते.
वृश्चिक:- सकाळी ग्रहमान अनुकूल आहे. कामे पूर्ण करून घ्या. संयम ठेवावा लागेल. स्त्री धन वाढेल. आर्थिक लाभ होतील. मात्र नैतिकता सोडू नका. कामानिमित्त भ्रमंती घडेल.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. आज प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे. विवाह इच्छुकांना खुश खराब मिळू शकते. मन प्रसन्न राहील. तुमचे आवडते छंद जोपासले जातील. सरकारी कामात मात्र दिरंगाई नको. विनाकारण सरकारी अधिकाऱ्यांशी वाद घालू नका.
मकर:- ग्रहमान अनुकल आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी महिलांकडून सहकार्य मिळेल. वस्त्रे, अलंकार विक्रीतून लाभ होतील. तुमचे स्पर्धक मात्र आज बलवान असणार आहेत.
कुंभ:- दिवसाची सुरुवात फारशी चांगली नाही. मात्र सकाळी ११ नंतर अनुकूलता वाढेल. ग्रहमान तुम्हाला समाधान देईल. व्यवसाय वाढेल. कुलदेवतेची कृपा दृष्टी लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. भौतिक सुखे प्राप्त होतील. आरोग्याचे प्रश्न मात्र निर्माण होऊ शकतात.
मीन:- सकाळी ग्रहमान प्रसन्न आहे. मदत मिळणार आहे. स्वप्ने साकार होतील. वाहन सुख मिळेल. दुपार नंतर मात्र अनुकूलता नाही. महिलांकडून सहकार्य मिळणार नाही. गैरसमज होऊ शकतात.