तळमावले/वार्ताहर : बुधवार दि.20 एप्रिल, 2024, रोजी झालेल्या वादळी पावसामुळे काळगावातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला सर्वाधिक हानी पोहोचली असून शाळेच्या इमारतीचे छप्पर उडून गेले आहे. ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोग शाळेतील उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
पन्नास वर्षांपूर्वी गावाच्या आजूबाजूला दहा किलोमीटर परिसरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध नसल्याने रयत शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली. सध्या या शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी (विज्ञान) पर्यंतच्या 230 विद्याथ्र्यांना शिक्षण दिले जाते. ही शाळा पावसाळा सुरू होण्याअगोदर पूर्ववत होणे आवश्यक असून त्यासाठी अंदाजे रु. 18 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांनी आपापल्या परीने शाळेला मदत देवू केली आहे. परंतु अवकाळी पावसाने होवू शकणारे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी तसेच जून मध्ये वेळेवर वर्ग सुरू करण्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी केले आहे. सदर मदत
Bank A/C Name –
Head Master, New English School, Kalgaon.
A/c No.1186006003222
IFSC Code – SDCE0001186
Bank Name –
DCC BANK, SATARA.
BRANCH -KALGAON.
Tal -Patan .Dist -Satara.
Mobile No.: 9822500896 या खात्यावर स्वीकारली जात आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी आणि माजी विद्यार्थी यांनी सहकार्य करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे यांनी केले आहे.
वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शाळेसाठी मदतीसाठी आवाहन
RELATED ARTICLES