सातारा(अजित जगताप) : निवडणुका म्हटलं की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. मला पण आणि आरक्षण पडल्यानंतर माझ्या पत्नीलाही सदस्य करा .यासाठी वशिला लावावा लागतो. परंतु शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे. त्याला बगल देऊन महायुतीच्या समर्थकच आपल्या घरातील लक्ष्मीला न्याय हक्कापासून वंचित ठेवत असल्याची बाब उघड झाली आहे.
उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असे एकेकाळी बोलले जात होते. त्याचा सन्मान राखून महाराष्ट्र सरकारच्या महायुतीने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावून शेतकऱ्याच्या पत्नीलाही सन्मानाने शेतकरी समजावे. शेतीच्या कामांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून त्याची लक्ष्मी सुद्धा झटत असते. हाच धागा पकडून महायुती सरकारने लक्ष्मी मुक्ती योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून पत्नीलाही पती हयातीत असताना शेत जमिनीवर सह हिस्सेदार म्हणून नाव लावण्यात यावे. अशी योजना कार्यान्वित झाली आहे. परंतु, सातारा जिल्ह्यामध्ये ५५२ वसुली गावातील केवळ ११८९ शेतकऱ्यांच्या जमिनीवर पत्नीचे नाव सह हिस्सेदार लावण्यात आले आहे. यामध्ये सातारा तालुका आघाडीवर असून सर्वात कमी खटाव आणि पाटण तालुक्यात लक्ष्मी वंचित राहिले आहे. नवलेची गोष्ट म्हणजे विविध शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकारी यांच्या पत्नीची शेत जमिनीच्या सातबारावर सह हिस्सेदार म्हणून नाव लावले नाही. त्याबाबत काही पदाधिकाऱ्यांनी पत्नीचे नाव शेत जमिनीवर लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आपल्या हक्कासाठी महिला संघटना व महिला पदाधिकारी एकादी घटना घडल्यानंतर मोर्चे, आंदोलन, निदर्शने व निवेदन देतात. मात्र त्यांच्या पतीने त्यांच्या शेतजमिनीवर नाव लावून सह हिस्सेदार केलेले नाही. हे माहीत असून सुद्धा त्या आवाज उठवत नाहीत. ही नारीशक्ती कमी पडत असल्याचे मत महिला वर्गच व्यक्त करत आहेत.
स्वतःच्या राजकीय पक्षाच्या एखाद्या घटनेबाबत मौन धारण करणे. दुसऱ्या पक्षाच्या बाबत आक्रमक होणे. यासाठी महिला वर्ग सातारा जिल्ह्यात जागृत असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता महिलांना अर्धांगिनी म्हटले जाते. राजकीय नेत्यांच्या सोबत निवडणुकीतही सक्रिय सहभाग घेणाऱ्या महिलावर्ग माहेरातून शिधावाटप पत्रिकेतून नाव कमी करताना त्यांची संपत्ती फारशी नसते. वजनदार पतीला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत चांगलीच वाढ होते. हे शपथपत्रातून लपून राहिले नाही. त्याला अपवाद फक्त शेतजमीन आहे. महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थकांनी अगोदर आपल्या पत्नीच्या नावाने शेत जमिनीवर सह हिस्सेदार अशी नोंदणी करून इतरांना तत्त्वज्ञान सांगावे. कारण, सध्या सातारा जिल्ह्यामध्ये महायुती म्हणजेच कार्यकर्ता अशी नवी ओळख झालेली आहे. अंदर की बात आता लवकरच बाहेर पडणार आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने आता लक्ष्मीची पावले लोकशाहीमध्ये अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे. याची चर्चा सुरू झालेली आहे.
—— —– —— —— ——– —— ——- ——- —
चौकट — साताऱ्यात मोठ्या प्रमाणात भूमिहीन कुटुंब आहेत. काही पती-पत्नी ही दोघेही कष्ट करून संसार करत आहेत. त्यांच्याबाबतही मायबाप सरकारने चांगले धोरण राबवावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे व सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्रनाथ जाधव यांनी केली आहे.
____________________
फोटो — शेतात राबणारे पती-पत्नी प्रतिनिधी स्वरूपातील छायाचित्र