प्रतिनिधी : सौ. वृषाली हेमंत सामंत यांचे एकल चित्रप्रदर्शन हे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पु . ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५ येथे आयोजित करण्यात आले असून ते ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असणार आहे. या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींचा प्रवास, विविध चित्र प्रयोग, आणि अभिव्यक्ती मांडण्यात येणार आहे. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता वाघमारे सर, पद्मश्री उदय देशपांडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, गायिका केतकी भावे – जोशी, चित्रपट कलानिर्देशक श्री. अजित नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्थळ : पु . ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५ येथे होणार आहे.
सौ. वृषाली हेमंत सामंत यांचे चित्रप्रदर्शन
RELATED ARTICLES