धारावी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धारावी विधानसभा मतदारसंघातील शाखा क्र. १८३ चे शाखाप्रमुख सतीश दत्तू कटके यांनी पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाला धारावीतील मान्यवर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विभाग क्र. १० चे विभागप्रमुख आमदार महेश सावंत, धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, उपविभाग प्रमुख महादेव शिंदे, उपविभाग समन्वयक जावेद खान, फलटणचे संपर्कप्रमुख व माजी युवा विभाग अधिकारी प्रमोद बाबुराव माने, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले, मृत्यू पट्टण, माजी शाखाप्रमुख बाबासाहेब सोनवणे, शाखा संघटक गणेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला शिवसैनिकांचाही मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला. महिला शाखा संघटिका उषा मोतीवाले, महिला विधानसभा समन्वयक मायाताई जाधव, उपविभाग संघटक मंजुताई वीर यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. यावेळी बोलताना सतीश कटके यांनी सांगितले की, “ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी असून, अशा उपक्रमांमधून समाजाशी आपली नाळ अधिक दृढ होते.”
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडले आणि यासाठी सर्व उपस्थितांनी संयोजन टीमचे अभिनंदन केले.