मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माध्यमसमूह, संपादक, स्वत: पत्रकार अथवा इतर सहकारी पत्रकारही त्यांना योग्य वाटते अशा पत्रकाराचे नाव या पुरस्कारासाठी सुचवू शकतात. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. शाल, श्रीफळ, रु.११०००/-, पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकारितेत उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कारास पात्र ठरणार्या पत्रकाराचे नाव, आवश्यक ती कागदपत्रे व कात्रणांसह मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर चौक, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात सोमवार दि. ४ ऑगस्ट, २०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठवावीत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे. शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित माहिती (बातमी, वृत्तांत, लेख इ.) आवश्यक झेरॉक्स प्रतीसह mmps.president@gmail.com या ईमेलवरही पाठवता येईल.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन
RELATED ARTICLES