मठाचीवाडी ( ता. फलटण ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील मठाचीवाडी हे गाव एक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सुसंस्कृत गाव म्हणून ओळखले जाते. गावकऱ्यांच्या आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने झालेला शैक्षणिक उठाव आणि येथील शिक्षकांच्या अथक परिश्रमाने या शाळेची गुणवत्ता आणि खेळातील यश देखील वाखानण्याजोगे आहे. 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आणि तब्बल 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. यामध्ये संचित जाधव, स्वामिनी लामकाने, शिवम पवार, वेदांत कन्हेरकर, श्रावणी भंडलकर, तेजस काळे, आदित्य शेलार, विश्वजीत चिखलठाणे, शरयू पिसाळ, वेदांत कदम, स्वराजसिंह कांबळे आणि अर्जुन भोसले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच यावर्षी झालेल्या मंथन, बीडीएस आणि IAS अभिरूप परीक्षेमध्ये मनस्वी नायकोडे,स्वरांजली भोसले, धनराज भोसले या विद्यार्थ्यांनी जिल्हा-राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्याचप्रमाणे स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथील मोठ्या गटातील मुलांचा कबड्डीचा संघ जिल्हास्तरावर विजेता ठरला. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांवर गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मठपती साहेब आणि केंद्रप्रमुख श्री निकाळजे साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक तांबे सर, देशपांडे मॅडम,शिंदे सर, भोसले सर, पाठक मॅडम, आढाव सर, गावडे सर आणि वर्गशिक्षक भोगल सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितीन शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेत मठाचीवाडी जि. प. शाळेची यशाची परंपरा कायम
RELATED ARTICLES