मुंबई (शांताराम गुडेकर/संतोष गावडे) : अंधेरी पुर्वस्थित मरोळ, सगबाबाग येथे शिवसेना (उबाठा) शाखा ८६ अंतर्गत, भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या माध्यमातून, पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, रविवारी (दि.२७ जुलै ) भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर पार पडले.सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत चाललेल्या या शिबिरात सर्व आजारांच्या दृष्टीने रक्ताची तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदय विकारासंबंधित ईसिजी तपासणी, डोळ्यांच्या बहुतेक विकारांचा विचार करता त्यावरील तपासण्या, आदी सर्व तपासण्या विनामूल्य करण्यात येऊन, नागरिकांना आवश्यक काही औषधे सुद्धा विनामूल्य देण्यात आली.
गेली काही वर्षे आयोजित या आरोग्य शिबिरात यावेळी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते.अनेक रक्तदात्यांनी उत्सुर्त सहभाग देत रक्तदान केले.तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी आधार काठ्यांचे सुद्धा यावेळी वाटप करण्यात आले.
मुंबईतील सध्याच्या वातावरणाचा विचार करता असंख्य नागरिक विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. त्याकरिता आपण काहीतरी करणे आवश्यक आहे, असा विचार मनात आला आणि आपण त्यादृष्टीने कामास लागलो. गेली काही वर्षे शिवसेना (उबाठा) शाखा ८६ आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या सहकार्यातून आपण हे आरोग्य शिबिर आयोजित करीत आहोत, असे भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि उपशाखाप्रमुख पदी कार्यरत असलेले, शिबिराचे आयोजक श्री राजुदादा सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.शिबिराच्या माध्यमातून होणारी ही छोटीशी जनसेवा ह्याच खऱ्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना आपण दिलेल्या शुभेच्छ्या आहेत, असेही राजुदादा यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तीकर, माजी आमदार ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत,गुरुनाथ खोत, मनोहर पांचाळ, शाखाप्रमुख बिपीन शिंदे, शुभम सुर्यवंशी, युवासेनेचे किरण पुजारी, देवेंद्र भोसले, लक्ष्मण घाग, यशवंत कुंभार, संजय पावले, राम साळवी आणि विभागातील सेनेचे इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि विभागीय नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी घाटकोपरस्थित वेदांत हॉस्पिटल यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
अंधेरीत भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबिर संपन्न
RELATED ARTICLES