Thursday, July 31, 2025
घरमहाराष्ट्रराज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

प्रतिनिधी : भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील १०६ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे मंगळवारी (दि. २९ जुलै) झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२२ तसेच २०२३ च्या स्वातंत्र्य दिनी व २०२३ तसेच २०२४ या वर्षांच्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

अनुप कुमार सिंह, प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ मनोज कुमार शर्मा यांचा सन्मानित अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता.

चौसष्ठ (६४) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, चार (४) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच अडतीस (३८) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांसह पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते अलंकृत करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments