कोपरखैरणे (नवी मुंबई) : “राजकारण बाजूला ठेवून समाजकारणामध्ये महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान नेहमी सक्रिय असते, याचा मला अभिमान आहे,” असे उद्गार महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष बाबुराव दादा संकपाळ यांनी काढले.
ते प्रतिष्ठानचे प्रमुख संघटक विष्णु शिंदे सर यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त कोपरखैरणे येथे आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात “एकीचे बळ” या संकल्पनेवर भर देत संकपाळ दादांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “आपली कर्मभूमी व मातृभूमी यांच्यातील नाळ जोडण्याचे कार्य प्रतिष्ठानद्वारे प्रामाणिकपणे सुरू आहे,” असे मत *प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले. त्यांनी संस्थापक संकपाळ दादांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची वज्रमुठ बांधून सामाजिक कार्य अविरत सुरू राहील, असा विश्वासही व्यक्त केला.
कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नागरी संरक्षण दल नवी मुंबई समुह ठाणे कोपरखैरणे विभागीय क्षेत्ररक्षक अरुण सातपुते सर, हनुमंत सावळे साहेब, DDM न्यूज नेटवर्कचे संपादक भीमराव धुळप साहेब यांनी उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानला सहकार्याचे आश्वासन दिले.
तसेच साताऱ्याहून आलेले बजरंग शिंदे गुरुजी आणि इतर मान्यवरांनी मनोगतपर शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला *सुयश शिक्षण संस्थेचे रमेश संकपाळ, प्रतिष्ठानचे खजिनदार गंगाराम जाधव (बिल्डर), कुशाबा सकपाळ, पांडुरंग संकपाळ, विठ्ठल बुवा तोरणे, किसन शिंदे, अशोक शिंदे, शंकर दादा सकपाळ, संजय मोरे, लक्ष्मण शिंदे मुकादम, राजु संकपाळ, सुरेश शिंदे, शंकर शिंदे तसेच कुरोशी व वारणेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख गणेश जाधव व राजेश देसाई यांनी केले.