प्रतिनिधी : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मध्य रेल्वेकडून उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांवरून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित स्थानकावर थांबेल आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल. ती सीएसएमटी येथे सकाळी ११.१० ला पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी सीएसएमटी येथे ४.४४ ला पोहोचेल. सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.