सातारा(अजित जगताप) : सातारा तहसील कार्यालया मधील तहसीलदारांचा थम नसल्याने नवीन शर्तीच्या जमिनीच्या परवानगी लागत नाही.तसेच इतर कामकाजाबाबत निर्माण झालेले आहेत. याबाबत आता सकारात्मक दृष्टिकोनातून दुरुस्ती होऊन दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून तहसील कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरू होईल अशी माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
गेले अनेक दिवसापासून सातारा तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांची बदली झाल्यामुळे अनेक कामकाज थंडावले आहे. वर्ग दोन च्या दस्त खरेदी व विक्री बाबत तहसीलदारांचा थम काढायला लागतो तो न निघाल्यामुळे अनेक प्रकरण प्रलंबित राहिलेले आहेत वारस नोंदी व नवीन नोंदणी होऊ शकलेल्या नाहीत. त्याकडे सातारा तालुक्यातील नागरिकांनी लक्ष वेधून घेतलेले आहे.
सातारा तहसील कार्यालयाच्या सर्व्हरमध्ये (server) काही तांत्रिक समस्या येत असतील, तर त्याबद्दल तुम्ही तहसील कार्यालयात किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातून सर्व बाबत अडचणी असल्यामुळे कामकाज करता आले नाही ही वस्तुस्थिती समोर आली आहे. आता तांत्रिक दुरुस्ती होऊन दिनांक एका ऑगस्ट पासून सातारा तहसीलदार समीर यादव हे
तुमचा वापर करतील. त्यामुळे भविष्यात अडचण येणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान यामुळे सातारा तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकांच्या समस्या सोडवण्यास अडचणी येत होत्या त्या दूर होण्याचे संकेत मिळाल्याने कामकाजाला गती येणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
—- —— —— —– —— —— ——
फोटो — सातारा तहसील कार्यालय व तहसीलदार केबिन (छाया– अजित जगताप सातारा)
——- ——– ——- ——- ——- ——