प्रतिनिधी : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजन पारकर यांचे वडील श्री दत्तात्रय नारायण पारकर यांचे आज सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी राजन पारकर यांचे मोठे बंधू यांच्या पश्चिम येथील राहत्या घरी ‘पारकर सदन’, कुलकर्णी वाडी, गणेश मंदिर समोर, जंगलेश्वर महादेव मंदिर मार्ग, घाटकोपर पश्चिम या निवासस्थानी निधन झाले. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. घाटकोपर येथील निवासस्थानातून कै. दत्तात्रय पारकर यांची अंत्ययात्रा मोक्ष रथातून भटवाडी स्मशानभूमी, घाटकोपर पश्चिम येथे गेली. समाजातील सर्व स्तरातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. राजन यांनी पार्थिवास अग्नी दिला त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून दत्तात्रय पारकर हे आजारीच होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
जेष्ठ पत्रकार राजन पारकर यांना पितृशोक
RELATED ARTICLES