वरळी, मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, वरळी विधानसभा यांच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा उत्सव वरळी येथील ‘आनंद निकेतन’ या निराधार ज्येष्ठ नागरिक आश्रमात साजरा करण्यात आला.
या वेळी आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वादिष्ट भोजन व्यवस्था कक्षाच्या वतीने करण्यात आली होती. हा उपक्रम केवळ औपचारिक नव्हता, तर ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात आनंद आणि आपुलकी निर्माण करणारा ठरला.
कार्यक्रमास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव निखिल सावंत प्रमुख उपस्थित होते. कक्ष विधानसभा संघटक कृष्णकांत शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कक्षाचे कार्यालय चिटणीस राजेश चव्हाण, उपसंघटक विजय पवार, रामचंद्र वेमुला, सुजित नलावडे, कक्ष प्रसारक सुशील वर्मा, वार्ड संघटक भालचंद्र कदम, संतोष हिनुकले, धनराज गुंटूक व संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम सामाजिक जाणीव जागृत करणारा ठरला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जनतेच्या सेवेत आणि ज्येष्ठांच्या सहवासात साजरा करण्याची ही शिवसेनेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करतो.