मुलुंड(सतिश वि.पाटील) : आज रविवार दिनांक २७जुलै २०२५ रोजी ,दिंडी गड ,सोनाळे भिवंडी येथे
आमची गोसेवा ! श्री.सतिश वि.पाटील (पत्रकार मुंबई) श्री.प्रविण पाटील (सर्पमित्र सुरई) खूप प्रसन्न आणि उत्साहात आज आम्ही गो सेवा केली. थोडी अंग मेहनत ही झाली ,रस्त्यात येताना थोडी फार कोबी पाने, पालक भाजी आणि फ्लॉवर अशी भाजी आम्ही गो मातेला घेऊन गेला कदाचित खाणार का नाही असा प्रश्न उपस्थित होता.पण सर्व आवडीने खातात कारण रोज चारा उपलब्ध असतो ,गवत,
कडबा,पेंढा,चूनी ,चारा आज जरा वेगळाच खाद्य मिळाले म्हणून सर्व गो माता यांनी खाद्य संपवले ,त्या नंतर पत्रकार श्री.सतिश वि.पाटील आणि सर्पमित्र श्री.प्रविण पाटील यांनी मिळून सर्वात आधी गोशाळेतील शेण जमा करून एका ट्रॉलीच्या साह्य़ाने जमा करून गोशाळेबाहेर टाकले नंतर पाण्याने सर्व गोशाळा स्वच्छ केली साधारण २५ गोमाता आणि ६ वासरे आज गोशाळेत उपलब्ध होती बाकी चरण्यासाठी सोडले होते .एक रविवार सार्थकी लागला असे आम्हास भाग्य लाभले.आणखी दोन गोसेवक आमच्या सोबतीला आले मडवी भाऊ आणि बलवत्त भाऊ यांनी आम्हाला मदत केली.आपण ही एखाद दिवस गोसेवेचे लाभ घ्या. एक वेगळाच आनंद व प्रसन्न वाटते. जमल्यास वस्तूरूपात ही सेवा करू शकता बर्याच वेळा आपण परिसरात स्वच्छता मोहीम राबवतो, तेथे कचरा करणार मानव असतात बेशिस्त पण कुठेही कचरा टाकून परिसर घाण करतात मनुष्यप्राणी असून, पण गोशाळेत मुके प्राणी असतात त्यांना बोलता येत नाही त्या मुळे मानव सेवा भाग वेगळा आणि गोसेवा भाग वेगळा विचार आपण करायचा काय केले पाहीजे ,रविवार सुट्टीत तर सर्वच पिकनिक ला जातात पण ही एक सेवा करून पैसे खर्च करून ही आनंद न मिळणारा असा होता.जय श्री कृष्ण, जय श्री राम!
एक रविवार गो सेवेसाठी…..
RELATED ARTICLES