मुंबई, चेंबूर – “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर येथे दिनांक २७ जुलै २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोघसिद्ध सीताबाई आप्पाराव पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणात ७० व परिसरात एकूण १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात शाळेचे शैक्षणिक व प्रशासकीय पदाधिकारी, विद्यार्थी, स्काऊट-गाईड युनिट, पालक, तसेच नागरी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. दिलीप विष्णू स्वामी (विभागीय समादेशक), नागेश ढवळे, रमेश सकट, योगेश घनदाट आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्री शशांक यांनी १०० वृक्ष पुरवले. पर्यावरण रक्षणासाठी शाळेच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.