भुईंज : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी सातारा जिल्ह्यात सुमारे शंभर नवीन बस दिल्या आहेत. परंतु, गाजावाजा केलेल्या शिवशाही बस पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात पेटली आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गामध्ये घबरहाट पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की रविवार दिनांक २८ जुलै रोजी कोल्हापूर आगारातून सुमारे सकाळी आठ वाजता कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठी शिवशाही बस क्रमांक एम एच०६ बी डब्ल्यू ३५२३ ही बस निघाली होती. सातारा जिल्ह्यातील भुईज तालुका वाई महामार्गावर शिवशाही बस आल्यानंतर बसने अचानक पेट घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाहन चालक यांनी तातडीने महामार्ग शेजारी सुरक्षित स्थळी शिवशाही बस उभी करून इतर वाहनांना सूचना केली. त्याचबरोबर प्रवाशांनी आपापले साहित्य घेऊन शांततेत बाहेर पडावे. अशी सूचना केली. त्यामुळे सकाळी झोपेत असलेल्या काही प्रवाशांची चांगली झोपमोड झाली. आपले जीव वाचण्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. अपघातानंतर याबाबत अधिकृत माहिती अद्याप एस.टी महामंडळाकडून उपलब्ध झालेली नाही. सध्या मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झाल्यामुळे शिवशाही बस नेमकी कुठल्या कंपनीची आहे? हे समजू शकले नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे साध्या , निमआराम ,शिवशाही शिवनेरी, अशा सुमारे साडे पंधरा हजार पेक्षा जास्त बसेस आहेत. त्यामध्ये ८९२ शिवशाही बस सध्या महाराष्ट्रात धावत आहेत. शिवशाही बस वार्तांनाकुलीत असल्यामुळे तिकिटाचे दर सुद्धा गारठा आणणारे आहेत. तरीसुद्धा महत्त्वाच्या कामांमुळे प्रवाशांना प्रवास करावा लागतो. कोल्हापूर इथून मुंबईला निघालेल्या प्रवाशांना शिवशाही बस पेटल्याने चांगलाच खोळंबा झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सकाळी ११ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावरील भुईंज पोलिस ठाणे व स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धावपळ केली. प्रवाशांना दिलासा दिला. दरम्यान, यापूर्वीही सातारा तालुक्यातील वाडे फाटा येथेही बस पेटण्याचा प्रकार घडला त्याचे पुढे चौकशीत काय झाले? हे मात्र समजू शकले नाही.
—————————-
फोटो – सातारा जिल्ह्यातील भुईज महामार्गावर पेटत असलेली शिवशाही बस….