माळ सोन्ना – परभणी जिल्ह्यातील एकाच दिवशी साडेतीन लाख वृक्षसंवर्धन करून विक्रम करत असताना माळसोन्ना ग्रामपंचायतीने गाव परिसरातील मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी केलेले कौतुकास्पद कार्य आहे. या गावाने सातत्याने लोकसहभागातून कार्यक्षमतेने आणि गावविकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याची विशेष दखल घेतली. त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावातील विकासकामांची पाहणी केली. सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थांचे खुलेपणाने कौतुक केले.
अंकुश चव्हाण यांनी सांगितले की, “या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गावाने जलसंधारण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण व पर्यावरण रक्षणाच्या दिशेने घेतलेले पावले इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरतील.”
ग्रामस्थांच्या सहभागातून साकारले गेलेले हे काम प्रशासनाच्या दृष्टीनेही आदर्शवत असून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी या गावाचे अनुकरण करावे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आवाहन केले.
चौकट –
“आदर्श गावाकडे वाटचाल”
शाळा अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी सुंदर छायाचित्र रंगरंगोटी
शाळेला ,अंगणवाडीला साहित्य खेळणी
शाळेत,गावातील रहदारीच्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा साठी गावात जलशुद्धीकरण यंत्रणा, शुद्ध पाण्यासाठी क्लोरीनेशन मिक्सर, हर घर जल, सौर पथदिवे, स्मशानभूमी परिसरात फळझाडे लागवड,वृक्ष संवर्धन,ग्रामपंचायीच्या सहकार्याने
गरोदर मातांची प्रसूतीसाठी पुरक असणारे
सुसज्ज अद्यावत उपकेंद्र उभारुन माळ सोन्ना ग्रामपंचायतीची आदर्श गाव निर्मितीकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पुष्पा काळे आणि सरपंच सौ वंदना शिवाजी शेळके, उपसरपंच श्री मधुकर लाड यांच्या कल्पनेतून ही वाटचाल यशस्वीतीकडे मार्गक्रमण करत आहे. याला लोकसहभागाची सक्षम साथ लाभत आहे.